नातं तुझं नी माझं.....
नातं तुझं नी माझं.....


नातं तुझं नी माझं.....
प्रेमाच्या अलिकडचं आणि मैत्रीच्या पलिकडचं...
नातं तुझं नी माझं......
कोणत्याही बंधंनात नसलेलं ....
वाहत्या नदीच्या प्रवाहासारखं......:
नातं तुझं नी माझं......
सगळ काही सामावून घेणारं...
नातं तुझं नी माझं......
न बोलता तुला काही कळावं मला काही कळावं...
नातं तुझं नी माझं......
सुदंर आपल हे नातं... विश्वासाने फुललेलं......
नातं तुझं नी माझं......
नजरेने नात खुलवावं अन् श्वासांची गती वाढावी...
नातं तुझं नी माझं....
जिथे शंकेला थारा नसावं...
नातं तुझं नी माझं......
तु चिडाव मी मनवावं...
मी रुसाव तु हसवावं......
नातं तुझं नी माझं......
शब्दात न मांडता यावं......
नातं तुझं नी माझं......
रुसव्या फुगव्यात प्रेमाने समजावं......
नातं तुझं नी माझं......
खुप प्रेम कराव खुप हसावं आयुष्य सार एकमेकांनच्या नजरेत बघत काढावं......