Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Tanmayee Marathe

Tragedy

3  

Tanmayee Marathe

Tragedy

आई

आई

1 min
13.7K


आई, आई किती हाक मारु ग तुला

ओ देना ग माझ्या हाकेला

का ग अशी निष्प्राण पडलीस तू?

आई आई किती हाक मारु ग तुला.

केला ग त्या राक्षसाने घात.

विध्वंस मांडला ग जगात.

ओ देना ग माझ्या हाकेला.

आई आई किती हाक मारु ग तुला.

ह्यांचा यद्धात झालो ग मी परका

कोण आपल काही कळेना

साद घालु कुणाला.

ओ देना ग माझ्या हाकेला.

आई आई किती हाक मारु ग तुला.

बाबाही काही बोलत नाही...

का ग ते आज ओरडत नाही मला?

का ग घेत नाही जवळ मला?

ओ देना ग माझ्या हाकेला.

आई, आई किती हाक मारु ग तुला.

बाबा उठत का नाही ग?

सगळीकडे... असे का पडलेत लोक?

सांग ना ग... 

ओ देना ग माझ्या हाकेला..

आई आई किती हाक मारु ग तुला.

नको ग माझी अशी परीक्षा पाहू 

मी झालो का ग परका तुमच्या स्पर्शाला.

घात झालाय ग आधीच माझा.

अजून तू नको ग तरसवू तुझ्या स्पर्शाला.

ओ देना ग माझ्या हाकेला.

थकला ग तुझा छकुला.

आता तरी ओ दे ग

ओ देना ग माझ्या हाकेला

 आतातरी ओ दे ग!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy