STORYMIRROR

Tanmayee Marathe

Fantasy Inspirational

3  

Tanmayee Marathe

Fantasy Inspirational

बालपणीचे ते दिवस

बालपणीचे ते दिवस

1 min
14K


कसे गेले ते बालपणीचे रम्य दिवस

कळलेच नाही

आठवणींचे रंग हातावरी ठेवून

 ते नाजूक फुलपाखरू

कधी उडून गेले कळलेच नाही

आई वडिलांची करंगळी धरून चालता चालता

कधी मोठे झालो कळलेच नाही

उनाडपणाला त्या बालपणीच्या

जाणिवेची किनार कधी आली कळलीच नाही

हवीहवीशी ती नाती

कधी विसरून गेलो कळलेच नाही

आयुष्याच्या या पानावर

आठवणीचे गोड क्षण कधी उमटले

कळलेच नाही.. कळलेच नाही

झालो कधी मोठे आले आता नविन क्षण वळण नवे आले आयुष्याचे

कळलेच नाही कळलेच नाही

फुलपाखरावानी हिंडलो आजवर

आता आली जबाबदारी, उभ राहु तरी निश्चयाने.

कधी चुकलो तर माफी असावी आम्हांस

निरोप घेतो आता आपुला.

आज्ञा असावी आता आम्हांस.   

       


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy