STORYMIRROR

Prof. Dr.Sadhana Nikam

Fantasy

5.0  

Prof. Dr.Sadhana Nikam

Fantasy

स्वप्न

स्वप्न

1 min
27.9K


स्वप्न सारे पाहू या

सुखाने सारे नांदू या

जगता जगता सार्यांना

मंत्र जगण्याचा देवू या

वसुंधरेचे पुत्र आम्ही

भान तिचे ठेवू या

बाळगून कृतज्ञता तिची

ऋणात सारे राहू या

एक मूल एक झाड

वृक्षसंवर्धन करू या

वनराईने नटवून धरती

सावली सुखाची घेवू या

संपवून घाट वृक्षतोडीचा

हाक मानवाला देवू या

स्वच्छ परिसर निकोप पर्यावरण

अपेक्षा आता करू या

थेंब थेंब जलसंवर्धन

टाकाऊ पासून टिकाऊ

जतन उर्जेचे करून

मंत्र समृद्धीचा जपू या

हव्यास भौतीकतेचा सोडून

चंगळवाद संपवू या

वळण राहणीमानाचे बदलवून

समतोल जीवनाचा साधू या

स्वप्न सारे पाहू या

सुखाने सारे नांदू या.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy