दिवस बालपणीचे
दिवस बालपणीचे
दिवस बालपणीचे
गड्या मस्त खेळायचं...
आनंदात जगायचं...
छान...
दिल,दोस्ती
सगळं कसं दिलखुलास....
गप्पा झकास...
निर्मळ...
क्रिकेट,विटीदांडू
धम्माल गोष्टी, गाणी
चोरून पिक्चरपाहणी
करायचं....
थोडी समजदार
थोड्या विहीरीतल्या उड्या...
थोड्या खोड्या....
बालपणी....
दोस्तीत सारं
सारं काही माफ...
चूक माफ...
लगेचच....
जिगरी दोस्त
मज्जा करू मस्त....
मिळवू हस्त....
मनातून...
थोडे अज्ञान
थोडे असते शहाणपण...
छान बालपण....
लहानपणी....