STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Action Inspirational Children

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Action Inspirational Children

शहिद भगतसिंग सुखदेव राजगुरू

शहिद भगतसिंग सुखदेव राजगुरू

1 min
273

शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू

क्रांतीचे बीज रोवण्याचे कामं केले सुरू....!!


भारतमातेचे थोर सुपुत्र,जमले सारे एकत्र

हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सुत्र..!!


स्वातंत्र्य मिळविण्यासाठी, अहोरात्र झटले

क्रांतीचे जाळे पसरण्या,सारे रक्त अटले....!!


इन्कलाब जिंदाबाद,वंदे मातरम् झाले सुरू

रक्ता रक्तात भिनले स्वातंत्र्य, चंद्रशेखर त्यांचे गुरू...!!


इंग्रजांना हाकलून लावण्या,हसत चढले फासावर

गुलामीत देश खितपत पडला,संकट मोठे देशावर...!!


गुलामीचा दाग धुण्या,झाले क्रांतीचे बीज सुरू

थोर क्रांतीकारक भगतसिंग,सुखदेव, राजगुरू....!!


भारतमातेचे वीर सुपूत्र,चला त्यांना नित्य स्मरू

मायभूला स्वातंत्र्य मिळविण्या,जोशाने लागे कार्य करू..!!


फाशीचा दोर लावला, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू

थोर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू,चला त्यांना वंदन करू...!!



இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Action