मी नसेल तर ....
मी नसेल तर ....
वाचव मला मानवा मानवा....
नाहीतर पेटल वणवा वणवा
लागेल आग तुझ्या आयुष्याला
मिळणार नाही पाणी विझवायला
राख होईल जीवन मानवा
वाचव मला मानवा मानवा.... ll १ ll
कन्या नको वाटते तुला
पुत्र हवा पाणी पाजायला
मी नसेल तर तुझा भला
संसार कसा होईल मानवा
वाचव मला मानवा मानवा.... ll २ ll
मी मुलगी, जननी, नारं
भांडेल, करेल प्रेम फारं
करु नका मा
झी हेळसांड
सुन शोधुनही नाही मिळणार मानवा
वाचव मला मानवा मानवा..... ll ३ ll
नुसता मुलगा जतन करुन
करता काय ? जगुन मरन !
माझ्या विना संसार अधुरा हा
घडणार कसा नर मानवा ?
वाचव मला मानवा मानवा.... ll ४ ll
तुमच्या घरी जन्म माझा
अंधश्रध्दा, भ्रम नाश करा
सद्विचारांचा लावा दिवा
मी इतिहास जगाचा मानवा
वाचव मला मानवा मानवा..... II ५ ll
.