महान वटवृक्ष
महान वटवृक्ष
सर्वगुण संपन्न वटवृक्ष हे महान
मूळ, खोड, साल, फुले, फळे हे महान
आजीवन देते दान, छाया ही महान
शुद्ध हवा प्राणवायू हवा ही महान
घेरदार भरदार रूप हे महान
पशू-पक्ष्यांचे घरदार झाड हे महान
आयुर्वेदाची खाण पर्यावरण हे महान
निसर्ग जीवन अनमोल हे महान
धरतीचा शालू पर्यावरण हे महान
धरतीची साथ वटवृक्ष हे महान
घेऊ पारंबीचे झोके क्षण हे महान
पर्यावरण सांभाळू गुणगान हे महान
