श्रेष्ठ ज्येष्ठ
श्रेष्ठ ज्येष्ठ
1 min
450
असतात काही ज्येष्ठ
विचाराने वरिष्ठ
असतात काही ज्येष्ठ
विचाराने कनिष्ठ
वयोमानाने काही ज्येष्ठ
असतात उत्कृष्ठ
वयोमानाने काही ज्येष्ठ
असतात भ्रमिष्ठ
तालावर नाचवता ज्येष्ठ
होतात खुप कष्ट
होतात काही वात्रट ज्येष्ठ
सारखे करतात आकृष्ठ
समजून घ्यावे लागतात ज्येष्ठ
आपण व्हावे श्रेष्ठ
लहान मुलांसारखे होता ज्येष्ठ
उद्दीष्ट आपले वरिष्ठ
दुखावले जाऊ नये आप्तेष्ट
प्रेम असावं स्पष्ट
आहेत आपले ज्येष्ठ श्रेष्ठ
करावे कर्तव्य श्रेष्ठ