सौंदर्यकला
सौंदर्यकला
दृष्टीस आपल्या गगनी चंद्रकला
सृष्टीत दडल्या सुंदर निसर्गकला
या धरणीवर बाजार कलाकलांचा
आपण ध्यास धरावा कलाकुसरीचा
फॅशनचा कपडा आहे मानाचा
सुदृढ स्त्री विजयी श्री झाली आता
विचार मोडा आता वाईट नजरांचा
आपण ध्यास धरावा सुसंस्काराचा
स्त्री घडविते पुरुषाला जाणून घ्या
पुरुष घडवितो स्त्री ला जाणून घ्या
फॅशन विचार करीते बाह्य रूपाचा
आपण ध्यास धरावा आदराचा
नसावा फक्त विचार सौंदर्य, फॅशनचा
विचार असावा आपल्या कर्तुत्वाचा
आरोग्यदायी विचार असावा फॅशनचा
आपण ध्यास धरावा आरोग्याचा
वस्त्रकला, दागिने कला, केसरचनांचा,
कलाकुसरांचा बाजार भरला सौंदर्याचा
सणावाराला आनंद बहरतो फॅशनचा
आपण ध्यास धरावा मानाच्या फॅशनचा