STORYMIRROR

Manisha Potdar

Others

4  

Manisha Potdar

Others

सत्याचे क्षणं

सत्याचे क्षणं

1 min
173

ऐतिहासिक ग्रंथ,पुस्तके

आहे आपले सर्वस्व

म्हणून तर लोकांवर

आहे त्यांचे वर्चस्व


ऐतिहासिक क्षणांचा आनंद

आहे ज्ञानेश्वर माऊली

अजूनही जमतात लोकं

पंढरपुरी घेण्यास सावली


ऐतिहासिक क्षणांची आठवणं

देतात गड किल्ले

स्वराज्यासाठी मावळे घेऊनं

शिवाजी राजे झिजले


ऐतिहासिक क्षण पहिली शाळा

सुरू झाली मुंलीची

आठवण देते महात्मा ज्योतिबा

सावित्रीबाई फुलेंची


ऐतिहासिक लढा स्वातंत्र्याचा

भारताने परकीयांशी केला

साजरे करतो स्वातंत्र्यदिन

त्या वीरांमुळे भारत स्वतंत्र झाला


ऐतिहासिक क्षणांची उत्कंठा

बघण्यास चंद्रयान मोहिमा

शास्रज्ञांचे अथक परिश्रमाने

उचलल्या मोठ्या जोखिमा


Rate this content
Log in