Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Potdar

Inspirational

5.0  

Manisha Potdar

Inspirational

ताकद कमवा

ताकद कमवा

1 min
214


ताकद कमवा, ताकद कमवा

ठेवा ही एक आठवण ॥ धृ ॥

करा शक्तीने स्वतःचे संरक्षण

नट्टा पट्टा रोज करता तुम्ही

अभ्यासही रोज करता तुम्ही

तशीच शक्ती ही कमवा

ठेवा ही एक आठवण

ताकद कमवा, ताकद कमवा

ठेवा ही एक आठवण ॥ १ ॥


करा युक्तीने स्वतःचे संरक्षण

कष्ट करता खूप रोज तुम्ही

पैसाही कमवता खूप तुम्ही

तशीच युक्ती ही कमवा

ठेवा ही एक आठवण

ताकद कमवा, ताकद कमवा

ठेवा ही एक आठवण ॥ २ ॥



करा संकटात स्वत:ला सावधान

विश्वास कुणावर ठेवू नका तुम्ही

तिखट,मीठ,तेल सोबत ठेवा तुम्ही

तशीच सुई धागा,कंपास ही जमवा

ठेवा ही एक आठवण

ताकद कमवा, ताकद कमवा

ठेवा ही एक आठवण ॥ ३ ॥



करा कराटेने स्वतःचे संरक्षण

नृत्य, गाणे करता तुम्ही

छंद ही जोपासता तुम्ही

तशीच घर कामानं ताकद कमवा

ठेवा ही एक आठवण

ताकद कमवा,ताकद कमवा

ठेवा ही एक आठवण ॥ ४ ॥



हानामारीचे घेऊन शिक्षण

हातात घ्या खंजीर तुम्ही

गोधडी पिळावी रोज तुम्ही

तशीच मनगटातं वाढवा बळ कमवा

ठेवा ही एक आठवण

ताकद कमवा, ताकद कमवा

ठेवा ही एक आठवण ॥ ५ ॥


Rate this content
Log in