ज्ञानगुरु
ज्ञानगुरु
ज्ञान देते आई पहिला गुरु
आईविना नाही जीवन सुरू
निसर्गाविना नाही आईचा जन्म
निसर्ग आहे म्हणून आपला जन्म
विश्वाची निर्मिती हेच आपले गुरु
दिले निसर्गाने अन्न, वस्त्र, निवारा
दिले निसर्गाने औषधी वनस्पती, झाडेझुडपे
करून अभ्यास ऋषी-मुनींनी
दिले आपल्याला ग्रंथ गुरु
मानवाने ऊतू नये मातू नये
निसर्गगुरूला हानी पोहचवू नये
उपकार आपल्यावर निसर्गाचे
ब्रम्हा, विष्णु, महेश जनक गुरु
शुद्ध हवा देती झाडेझुडपे
तुळशीमाता देई प्राणवायू
संगीत, नृत्य, अनेक कलागुरु
ज्ञानाचे भांडार निसर्ग गुरु