कैद
कैद
दुभंगल्या मना मी कसे सावरावे
अजून आसवांनी किती पाझरावे
जळून राख झाली तयांची मुजोरी
अपंग श्वापदांना नं तू घाबरावे
उगाच खेकड्यांच्या अशा हालचाली
उजाळता मशाली तयांनी डरावे
अस्तास सूर्य गेला कुठे भाकरीचा
सुळावरी भुकेच्या कितीदा मरावे
गुलाम चंद्र तो कैद ह्या चांदराती
नभास या अता का कुणी पांघरावे