STORYMIRROR

Anil Date

Fantasy

3  

Anil Date

Fantasy

आशा

आशा

1 min
14.6K


प्रकाशल्या गं दाही दिशा

जशी तू पौर्णिमेची निशा


किमया तुझीच ही सारी

पालटे लक्तरांची दशा


आहे जो नयनात तुझ्या

नाही ती मदिरेत नशा


पाहून रुप दिव्य तुझे

मनोमन लाजली उषा


मिश्किल हासणे तुझे ते

मनी जागवे प्रेम आशा


व्यक्त करू प्रित मी कैसी

शोधू कुठे शब्द नी भाषा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy