मातृदिन का? नाही माझ्या नशिबी
मातृदिन का? नाही माझ्या नशिबी
मातृदिन
का ? नाही
माझ्या नशिबी
हुरहुरते मन माझे
का ? कुस रिकामी
मातृदिन
का ? नाही
माझ्या नशिबी
वेदनेने हृदय माझे
होई पाणी पाणी
मातृदिन
का ? नाही
माझ्या नशिबी
लाखो प्रश्न माझे
विधात्यास हाक देई
मातृदिन
का ? नाही
माझ्या नशिबी
सांग काय झाले पाप माझे
का ?ठेवलीस कुस रिकामी
मातृदिन
का ? नाही
माझ्या नशिबी
दे उत्तर माझे
का ? उत्तर तुझ कडे नाही
मातृदिन
का ? नाही
माझ्या नशिबी
का दिले वात्सल्याचे ओझे
अबाल बालक दिसे मातृत्व जागृत होई
दे मातृदिन
माझ्या नशिबी
अशा वात्सल्या पाई
पाहिन मातृत्व स्वप्न माझे
होईन मी अनाथांची आई