पसारा दुःखांचा
पसारा दुःखांचा
1 min
13.6K
हवेला म्हटलं
लहरत जा तू वाहताना
अन लहरी वाऱ्याची सखी हो ना
अशीच माझ्या अंगणी घुटमळून जराशी
उडवून ने माझ्या दुःखांचा पसारा
इतके जरी करू शकलीस
तर माझा जीव ओवाळून टाकीन
दूरवर पसरलेल्या हरित मखमलीवर
कारण तिथेच बागडत आहे आनंदाने
माझ्या मनात नाचणारा
भावविभोर झालेला मोर