मकरंद
मकरंद
उजाड राना मध्ये
तो चकोर लपला होता
त्या टिपूर चांदण्या मध्ये
मी चन्द्र पाहीला होता
तो अल्लड वारा रुंजी
घालीत रानफुलात
तेथे भ्रमर गुण गुणत
मकरंद चाखीत होता
अवचित श्रावण मेघ
चांदणे झाकीत गेला
त्या अधीर धारांनी ही
चन्द्र भिजत गेला
त्या चन्द्र फुला मध्ये
सुगन्ध दरवळत होता
त्या उजाड राना मध्ये
चन्द्र लाजला होता
