STORYMIRROR

Shila Ambhure

Fantasy

4  

Shila Ambhure

Fantasy

स्वप्न

स्वप्न

1 min
406

 


निद्रादेवीने एकदा

केली अशी गंमत.

स्वप्नांच्या दुनियेत

ठेवले मला तरंगत.


हलके नि अलगद

फिरू लागले आकाशी.

मऊ मऊ ढग आले

आपसुक हाताशी.


चमचम चांदण्यांचे

अलंकार बनवले.

परिराणीने मलाही

तिच्यापरी सजवले.


टपटप आवाजाने

लक्ष घेतले वेधुन.

स्वप्नीचा राजकुमार

आला घोड्यावर बसून.


जवळी बसावयाला

तो खुणावितो मला.

गाली लाजले मी अन्

गेले हळू बसायला.


ठेवता पाऊल खाली

आले मग भानावर.

गडप झाले सारे ढग

मी होते जमिनीवर.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy