काव्यांजली
काव्यांजली


निरागस ती
अवखळ सरिता
माझी कविता.
शृंगारपूर्ण
भासते विवाहिता
माझी कविता.
हसते गाली
लाजतेही कविता
प्रिया छेडीता.
माझी कविता
तेजस्विनी,गर्विता
अपराजिता.
रडते कधी
विव्हळते कविता
जशी पिडिता.
मनीच्या व्यथा
व्यक्त करी कविता
मी लपविता.
खुलते मीही
हात जिचा धरिता
अशी कविता.