STORYMIRROR

Shila Ambhure

Tragedy Inspirational

3  

Shila Ambhure

Tragedy Inspirational

सिंधु

सिंधु

1 min
182


हरवली आज। अनाथांची माय ।

वासरांची गाय। सिंधुताई।।


पोरक्यांस होती ।मायेचा आधार।

स्वप्नास आकार। तिने दिला।।


अनाथासी झाली । बाप आणि माय ।

दुधाची गं साय । निराधारा ।।


सोसल्यास किती ।असह्य वेदना ।

नरकयातना । जीवनात ।।


प्रेमाचा सागर । मायेची पाखर ।

ममत्वाचा स्वर । हरवला ।।


शमनार नाही ।ममतेची भूक ।

काय झाली चूक। देवा सांग ।।


एकटीच जरी । अनेकांची आई।

झाली 'सिंधु' बाई । नावासम।।


दाविली तू वाट । ठेवितो स्मरणी ।

नमितो चरणी । माई तुझ्या ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy