ओढ
ओढ

1 min

528
शाळेत जाण्याची
झाली मला घाई
देते तुला पापा
टाटा बाय आई।।धृ।।
कान्हा,राधा,पिंकी
राज आणि माई
दारातून मला
बोलावितो साई।।1।।
कर नको चिंता
सोबतीला ताई
खुप दिवसांनी
घंटा कानी येई
झाली मज खुशी
वाटे नवलाई
गुरुजीही आले
आल्या बघ बाई।।2।।
सुरक्षित शाळा
छान सारे काही
कसलीच आता
भीती मला नाही
खडू आणि फळा
वाट माझी पाही।।3।।
अभ्यासात कधी
मित्र साथ देई
संगे शिकताना
सारे सोपे होई
गणिताची भिती
पळूनिया जाई।।4।।