नवरात्रि
नवरात्रि
1 min
425
भद्रकाली
नारायणी
तूच दुर्गा
कात्यायनी...१
तू शाम्भवी
एककन्या
तू सावित्री
दक्षकन्या...२
चामुंडा तू
महोदरी
तू कराली
माहेश्वरी...३
तू बुद्धिदा
स्कंदमाता
मातंगी तू
देवमाता...४
सती,साध्वी
तपस्विनी
भवप्रिता
उत्कर्षिणी....५
रत्नप्रिया
तू सुंदरी
आद्या,जया
जलोदरी....६
चंद्रघण्टा
कालरात्रि
आली तुझी
नवरात्रि...७
उत्सवाच्या
समयास
मांडियेला
घट खास...८
माला घालू
रोज त्यासी
धूप राळ
पूजन्यासी....९
करिते मी
आराधना
देवी तुझी
उपासना....१०
