ससोबा(बालगीत)
ससोबा(बालगीत)


मी पाहिला ससा
ऐका होता कसा
पांढरा पांढरा
मऊ कापूस जसा।।धृ।।
उंच मोठे कान
शेपटी लहान
चाल ही दुडकी
खट्याळ बाळ जसा।।1।।
गवताचा चारा
ताजा ताजा हरा
खाता लठ्ठ होई
लोठेबाबाच जसा ।।2।।
डोळे लाल लाल
गोबरेच गाल
तोंडावरी मिशा
म्हातारबाबा जसा।।3।।
असा बाई कसा
भित्रा तू रे ससा
बीळात लपतो
उंदीरमामा जसा।।4।।