बालकविता-गुडबाय
बालकविता-गुडबाय
1 min
400
माझ्या दारात एकदा चिमणी
टिपीत होते चोचीत दाणे
प्रत्येक दाणा टिपताना तिचे
आजूबाजूला पाहणे
दाराआड लपून पाहात होतो
तिचे हे जगणे...
माझ्या छोट्याश्या हालचालीने
तिचे चपळपणे इकडे तिकडे पाहणे
उडून जाण्याच्या तयारीत सावध असणे
घाबरत घाबरत तिचे चालू होते दाणे टिपणे
न राहवून तिला पकडण्यासाठी...
माझा पुढे पडला पाय
चाहूल लागताच माझी,
भुर्रकन उडून तिने
केला मला गुडबाय!
