STORYMIRROR

Rahul Shinde

Others

3  

Rahul Shinde

Others

आर्त साद

आर्त साद

1 min
481


काळ निघून गेला,दिवस सरून गेले

वयाच्या पुढे जाऊन,मला वृद्धत्व आले


रस्त्यावरची एक भिकारीण होते मी

पैसे आणि पोटासाठी,मग वेश्या झाले मी


येणाऱ्या प्रत्येकाला फक्त शरीर हवे होते

मनापर्यंत मात्र कोणीच पोचले नव्हते


मनापर्यंत जाता ते निर्मळ दिसले असते

कळपात असूनही एकाकी भासले असते


सारे सोडावेसे वाटले तेव्हा परतीचे मार्ग बंद झाले होते

मनाविरुद्ध मग रोजच मी बलात्कार सोसले होते


तारुण्य संपल्यावर बदलून सारेच गेले

तेव्हा त्या अडगळीतून निघून मी आले


चार-चौघांसारखं जगण्यासाठी तुमच्यात मी आले

पण पापी म्हणून हिणवून समाजाने दूर लाथाडले


एकटेपणा मला आता खायला उठतो

दिवसाच्या उजेडातही मनात अंधार दाटतो


आर्त साद घालते,

शरीराने साथ सोडल्यावर कोणी बनेल म्हातारपणाची काठी?

नी क्रियाकर्म करायला कुठूनतरी येतील का नाती?


Rate this content
Log in