STORYMIRROR

Rahul Shinde

Inspirational

3  

Rahul Shinde

Inspirational

कळी

कळी

1 min
14.5K


झाडावरची ती कळी हळूहळू उमलली

रूप घेऊन फुलाचे ती जग जिंकाया निघाली

तिचा डौलदार बांधा तिचा सुगंध निराळा

गर्व न करता तिने तो इतरांस अर्पिला

तिच्याजवळ होते वातावरण प्रफुल्लित करण्याचे यंत्र

आपल्या सुगंधाने तिने साऱ्यांनाच केले मोहित

वेळ आली जेव्हा तिची कोमेजण्याची

हसत हसत जगाचा निरोप घेण्याची

खंत न करता झाडावरून गळून पडली

आईच्या कुशीतच तिची प्राणज्योत मालवली

माहित होतं तिला,

जीवन म्हणजे नाही फक्त फुलणं आणि कोमेजणं

त्या दोहोंच्यामध्ये जे असतं तेच खरं जगणं 


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Inspirational