आशा निराशा
आशा निराशा
1 min
1.1K
हे रंगीबिरंगी जीवन चालताना
मनात निर्माण होते आशा
पण त्या आशेची
शेवटी होते का निराशा?
आशा व निराशा
येतच राहतात आयुष्यभर
जगण्यासाठी प्रत्येकजण
भटकत असतो वणवण
निराशा झाली की कधीतरी
उडून जाते जगण्याची आशा
पण त्यातूनही पुन्हा उमलणारी आशा
फुलवत असते जगण्याची मनीषा
मनात उमलावी अशी एक आशा
जिचा शेवट न व्हावा निराशा
आणि त्यातून पुन्हा निर्माण व्हावी
परिपूर्ण जीवन जगण्याची आशा