STORYMIRROR

Rahul Shinde

Abstract

4  

Rahul Shinde

Abstract

मृत्यू

मृत्यू

1 min
28K


कॅन्सरशी मी झगडत होतो वर्षभर 

मृत्यू नावाच्या वरदानाची कृपा झाली मजवर 

दवाखान्यातली ती खोली मला कोठडी वाटायची 

स्वावलंबी नसल्याची कधी स्वतःवरच कीव यायची 

भेटायला येणारी माणसं माझी मला धीर द्यायची 

नजर चोरून मात्र हळूच स्वतःचेच अश्रू पुसायची 

कधी सूर्योदयाने उजळलेली सृष्टी मनभरून पहावीशी वाटायची 

पण त्या खोलीच्या चौकटीतून बाहेर पडण्याची मुभा नसायची

कधी ओरडून सांगावेसे वाटे, या खोलीतून मुक्ती द्या 

आयुष्याच्या अखेरच्या दिवसात, हवे तसे जगू द्या 

एक दिवस चोरपावलांनी मृत्यू आला 

सर्व वेदनांतून परलोकी घेऊन गेला 

रडतायत माझी माणसं, नाही मी त्यांच्यात म्हणून

सांगू कसा त्यांना, आहे त्यांच्यातच फक्त शरीरावाचून 

शाप नाही मृत्यू, आहे एक वरदानच 

मानवी वेदनांतून मुक्त होण्याचा एक सन्मानच


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract