STORYMIRROR

Mohit Sushil Kelkar

Abstract

4  

Mohit Sushil Kelkar

Abstract

हरवलेल्या स्वप्नांनो..

हरवलेल्या स्वप्नांनो..

1 min
41.9K


हरवलेल्या स्वप्नांनो, तुमची नाही, आमचीच चालेल मग्रुरी.

दिवस तुम्हाला आम्हीच दाखवला,

नाहीतर अस्तित्व आहे तुमचं,

फक्त काळ्या रात्री..


अंधारात तुमचं साम्राज्य,

बंद डोळयांपुढे तुमचं वास्तव्य.

आम्ही स्वप्नाळू, आमच्या लेखी,

तुम्हाला सत्यात उतरवणं जणू कर्तव्य..


ह्या साऱ्या रस्सीखेचीत,

कुठेतरी दिलात तुम्ही चकमा.

चूक एकच झाली,

कुरवाळत बसलो झालेल्या जखमा..


आता मात्र तुम्हाला,

तुमची जागा दाखवण्याची आलीय वेळ.

खूप रडलो, कुढलो,

आता संपवून टाकू तुमचा पोरखेळ..


दिवास्वप्न रंगवूच,

त्यांना सत्यातही उतरवून घेऊ भरारी.

कारण लक्षात ठेवा,

हरवलेल्या स्वप्नांनो, तुमची नाही, आमचीच चालेल मग्रुरी..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract