STORYMIRROR

Mohit Sushil Kelkar

Others

4  

Mohit Sushil Kelkar

Others

पुस्तक

पुस्तक

1 min
26.6K



परवा असाच पहुडलो होतो,

एक पुस्तक शेल्फमधून पडलं.

मोबाईल मधून हा नवा आवाज कसला,

म्हणत लक्ष मोबाईलकडेच गेलं..


वस्तुस्थिती लक्षात आली, पुस्तकाशी दृष्टीभेट झाली,

आणि जणू ते खिन्नपणे हसलं.

त्याची ती फडफडणारी पानं पाहताच,

मन भूतकाळात गेलं..


महाभारत, रामायण, महाराज, पानिपत,

शेरलॉक, कॉर्बेट पासून अगदी पुलं.

ह्या पुस्तकांनीच तर वर्षोनुवर्षे,

आपल्याला भरभरून हे सारं दिलं..


अगदी कॉम्प्युटर बद्दलचं ही सुरुवातीचं जुजबी ज्ञान,

विविध पुस्तकांमधूनच समोर आलं.

समजलंच नाही हे पुस्तक,

आपल्या आयुष्यातून परागंदा कधी झालं..


रोजचा पेपरही मोबाईल मध्ये वाचणारी जनरेशन आमची,

पुस्तकांवाचून नाही कधी अडलं.

कळतच नव्हतं गलबलून येण्यासारखं,

मग नेमकं काय घडलं..


मग ते पिंपळ पान, तो गुलाब, ते मोरपीस,

सारं सारं आठवलं.

कधी सुट्टीचा साथी, कधी झोपेचा सोबती,

सारं बालपण होतं ह्या पुस्तकांत साठवलं.


पुस्तकांच्या देवाणघेवाणीच्या निमित्तानेच,

नियतीने तिला सर्वप्रथम भेटवलं.

ते पहीलं-वहीलं प्रेमपत्र ही,

पुस्तकातूनच तर होतं पाठवलं..


आता क्लीक्स्, स्वाईप्स्, लाईक्स् च्या जमान्यात,

बुकमार्क्स ना ही नवीन स्थान सापडलं.

त्या केविलवाण्या पुस्तकाचं मनोगत मात्र,

कुणास ठाऊक कुठे रखडलं...


Rate this content
Log in