सुंगध मनी दरवळे
सुंगध मनी दरवळे


रात्र होता नशेमय
चांदणे टीपुरले
स्वप्नाने तुझ्या माझ्या
आभाळ हे भारले
अशा या समयाला
चंद्र होता धुंदलेला
सांग का लांब तु ?
उभी अशी राहीली
मिठी माझी तुला
जवळ ओढण्या आतुरली
ये अशी ये बाहेर अंगणात
ये फीरुया धुंद चांदण्यात!
गुलमोहर होता बहरलेला
गार वारा असा मुक्त सुटलेला
शब्द होते गोठलेले
श्वास होते तापलेले
शब्दांच्या थिनगीने अग्नी पेटवूया
तन मन वितळुन असे एक होवूया
हीरव्या हीरव्या डोंगराचा
विळखा असे गावाला
नदी वाहे खळखळत राहे
चाले अखंड प्रवासाला
आत्ममंग्न होवून
निसर्ग कुशीत घेऊन
तुझ्या माझ्या भेटी
होई तळ्याकाठी
सांज होता भासे
शांत शांत हे तळे
तुझ्या माझ्या मनात
सुंगध हा दरवळे