कविता -"सत्यधर्माची वाट"
कविता -"सत्यधर्माची वाट"
जळणारांनो जळत रहा
फुलून फुलून जळत रहा
कोळशा सारखं----------।।धृ।।
जळून जळून कोळशाची
होईल बघा राख
मदतीसाठी आम्हालाच
मारावी लागेल हाक ----।।१।।
जळणारांनो कोळशा सम
काळोख तुमच्या जीवन वाटेवर
कधीच तुम्हाला यश नाही
सत्यधर्माच्या वाटेवर-----।।२।।
आम्ही जळतोय
दिव्याच्या वातीसारखं
रक्तरूपी तेल जाळून
जळतोय प्रकाशासारखं --।।३।।
जळून जळून होणार नाही
आमची तुजसम राख
मदतीसाठी कधीच तुम्हाला
मारावी लागणार नाही हाक-।।४।।
आमच्या दिव्य,शुभ्र प्रकाशात
डोळ्यासमोर आम्हाला दिसेल
सत्य धर्माची वाट----------।।५।।