समाजजीवन
समाजजीवन
समाज। माणसाचं संरक्षक कवच
माणूस समाजातच जगतो, मरतो
समाज माणसाला घडवतो
माणसाशिवाय समाज नाही,
समाजाशिवाय माणूस नाही
समाजाशिवाय एकटा माणूस जगूच शकत नाही
समाजाचे अनंत उपकार असतात माणसावर
पण ते फेडण्याचे ऋण असते माणसावर
प्रत्येकाला हे कळतेच असे नाही
जो जागरूक आहे, प्रामाणिक आहे
त्यालाच त्याची जाण आहे
पण आज
आज हा समाज पोखरला गेलाय
भ्रष्टाचारानं,लाचलुचपतीनं,व्यभिचारानं
आज समाजाचं कुंपण कमकुवत झालंय
माणूसही आज बदललाय
त्याला पश्चिमेचं वारं लागलंय,
मोबाईलचं खूळ लागलंय
टीव्ही पाहून बेताल झालाय तो
स्त्रीचं जीवन हेंदकळलंय
असुरक्षित झालीय ती बिचारी
अरे माणसा,जागा हो रे
काय चांगले काय वाईट
याचा सारासार विचार कर रे
तुला समाजाची गरज आहेना रे
मग समाजाचे नियम तुला पाळावेच लागणार
समाजाला कमी लेखून चालणार नाही
अरे,समाज म्हणजे कोण रे?
समाज म्हणजे तूच रे
ज्या समाजात राहतोस,
जिथं सामाजिक जीवन जगतोस
तिथली सामाजिक बांधिलकी जप ना रे
समाजापासून लांब नको पळूस रे
शेवटी सामाजिक जीवन हेच खरे जीवन आहे
म्हणून सामाजिक जाणिव ठेव रे
तिचा मान राख रे
तिला मनापासून जप रे
तिला मनापासून जप रे