स्वातंत्र्य– ऐतिहासिक कविता
स्वातंत्र्य– ऐतिहासिक कविता
स्वातंत्र्य। सत्तर वर्ष झाली मिळालं
काय केलं आपण?
हिंसाचार, भ्रष्टाचार, महागाई
हे सर्व मिळवलं।
स्वातंत्र्य मिळालं,
आपलं कर्तव्य च विसरला माणूस
त्याची बुद्धी नतभ्रष्ट झाली
सारासार विचार करणेच तो विसरला...
यापेक्षा ती गुलामीच बरी म्हणायची
स्वतःचा,स्वकीयांचा विचार तरी व्हायचा
आज एकमेकांचा जीव घ्यायचाच विचार
पूर्वीच्या स्त्रियांना होता मान
आज होतेय तिची विटंबनाच फार।
कोण करतो हो हे सर्व?
मी?तुम्ही?की आणि कुणी?
कशाला एकमेकांकडं बोट दाखवता?
जरा स्वतःशीच विचार करा
काय मिळवलं,काय केलं या स्वातंत्र्याचं?
हजारोंच्या रक्तरंजित त्यागाचं
आपण किती मोल राखलं?
स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही
p>
स्त्री गुलामच दिसते आहे
तिचं वर्चस्व सहन होत नाहीये
सुधारणेच्या नावाखाली तू
भ्रष्टाचारी बनला आहे
स्त्रीभ्रूण हत्येचं पाप बिनधास्त करतो आहेस
भ्रष्टाचार करून महागाई वाढवली आहे
काय उपयोग या स्वातंत्रतेचा?
जर सर्व सुखसोई मिळूनही
मानवा तू असा वागणार आहेस
तर स्वातंत्र्य कशाला हवे आहे?
ऊठ,जागा हो,देशाकडे बघ।
आज कुठं चाललाय देश
त्याला वेळीच सावर,आधार दे
नाहीतर त्याला पुन्हा पारतंत्र्यात जावं लागेल
टपून बसलेत सगळे
भारताला खिशात घालून घेण्यासाठी
सावध हो। देश सांभाळ। मिळालेलं स्वातंत्र्य टिकऊन ठेव
स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक म्हणूनच रहा
पण त्यासाठी मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित राख,अबाधित राख.