ज्येष्ठ नागरिक
ज्येष्ठ नागरिक
घर झालं ओकंबोकं, नाही तिथं कुणी एक
अस्तव्यस्त पसारा नि रिकाम्या चार भिंती
माणुसपणच गेलं,नाती संपली
उरली फक्त रिकामी खोली------
भूकम्प झाला,माणुसकी ढासळली
माणसातील माणसंच हरवली
वयस्कराना वृद्धाश्रमात धाडली
स्वतः मन,वचन,काया भरकटली------
आज वातावरण बदललंय
नात्यात,घरात व्हायरस घुसलंय
भरल्या घरात रिकामी नाती
कोण कुणाला समजून घेती-----
मी माझा,तू तुझा
कुणाला कुणाची बांधिलकी
असुनी ओलावा,मनं कोरडी
घराची पूर्ण धूळधाण झाली-----
मोठं घर,कोतं मन
मनातल्या मनात नुसतं रड
नुसतं रडून उपयोग काय
अरे,जिथं प्रेमाचा ओलावाच संपलाय-----