परी
परी
1 min
282
अहो, तुम्हीच ना तिचे पालक?
तुमचेच ना ते बालक?मग
का करता तिला जगण्यापासून अलग?
गोजिरवाण्या लहानग्या परीचं निर्मळ हसू
घालावे ल तुमच्या निरस जीवनातील आसू
निखळ,निरपेक्ष ,शुद्ध प्रेम मिळेल
जेव्हा तिच्यावर प्रेम कराल निर्भेळ
वंशदिपिका आणेल वंशाला दिवा
घरीदारी वाटेल सुखाचा मेवा
परसदारी फुलवेल बगीचा
एकदा येऊ द्या तिला घरी तुमच्या
तुमच्याच रक्तामासाची
तुमच्याच प्रेमाची ही छोटीशी परी
स्वागत करा तिचे मनापासून घरीदारी
कारण आहे ती ती एक छोटीशी आकाशातील परी