आठवण
आठवण
1 min
233
पळपळ का पळतोस रे दिना
का थांबत नाहीस रे एकही क्षणा
वाटते मना सुख अजूनही अनुभवावे
वाटते साठवून ठेवावे मैत्रीच्या क्षणांना
पण भेटतील कारे परतूनी मजला
आयुष्यातील मैत्री चे क्षण आठवायला
तेवढाच विरंगुळा माझ्या या मनाला
ये रे क्षणा परत फिरुनी एकदा
अनुभवू देत गेले दिन पुन्हा
वळणावरती या असे मी उभा
आठवत राहतो अनमोल मैत्री पुन्हा पुन्हा
