सौंदर्य आणि फॅशन
सौंदर्य आणि फॅशन
अगं, एवढं काय निरखून पाहतेस?
काही नाही रे, माझंच रूप मी निरखतेय
मग काय दिसलं त्यात सांग
वाट्टेल तसा वाढलेला माझ्या शरीराचा बांधा,
अन सौंदर्याच्या, सुडौलतेचा झालेला शरिराचा वांदा
पूर्वी कशी रे होते मी बांधेसूद
आता त्याचा जराही दिसत नाही मागमूस
गेली शरीराची पूर्ण रया
मग कशी दिसेन मी पूर्वीसारखी पहाया?
येऊ लागलंय मला रडाया
मन म्हणते, कर आता सुरुवात व्यायामा
पण फॅशनच्या नावाखाली
करू नकोस डाएटिंग,
नको लाऊस जीम
करून भरपूर व्यायाम
टाक कॅलरीज जाळून
पण टिकवून ठेव स्टॅमिना
नाहीतर नवऱ्याला लावशील कामाला
