आधार
आधार
किती कष्टातून केलं लहानचं थोर
तुझ्याच पायी झिजवलं
शरीर
तुझ्या शिक्षणापायी झाली उपासमार
वाटंल बाळ माझं लई शिकणार
शिकून सवरून साहेब तू होणार
विचारानांच मन भरून येणार
कधी वाटलं हे बी दिस जाणार
बाळ माझं लई मोठ होणार
शाळा शिकून बाळ माझं कॉलेजात जाणार
चार चौघात शोभून दिसणार
नोकरी करून मोठा होणार
बाळ माझां लई मोठा साहेब होणार
बाळ माझा आधार होणार
शेवटी स्वप्न हे स्वप्न असणार
वास्तव मात्र काय वेगळेचं असणार
आई बापाला वृद्धाश्रम दाखवणार
आधारावीना घरपण हरवणार
असे हे दिसं आईबापास येणार
शेवटी वृध्दाश्रम आधार होणार
अंतःकरणाची नाती कायमची तुटणा