STORYMIRROR

Kavita Pudale

Classics

3  

Kavita Pudale

Classics

आषाढ वारी

आषाढ वारी

1 min
29.5K


आम्ही पंढरीचे वारकरी

भेटण्या विठूरायाच्या पंढरपूरी

श्री ज्ञानदेवाची पालखी निघेे भोयांचा खांद्यावरी

डोळे भरूनी पाहण्या विठूराया वारी निघे पंढरपूरी


वारकरी नाचे अभंगाच्या तालावरी

घेऊनिया भगवा झेंडा खांद्यावरी

वारी चाले टाळ, मृदुंगाच्या तालावरी

तुकोबांचे अभंग वारकऱ्याच्या जीभेवरी


वारकरी चैतन्य साऱ्या सृष्टीवरी

वारी चाले जरी दूरवरी

विठू राहे वारकऱ्याचा हदयावरी

विठू राहे त्याच्या अंतःकरणावरी


ज्ञानियांची पालखी निघे पंढरी

भेटण्या विठू राहे माझा पंढरी

वारकरी जाये वळणा वळणावरी

दिसे तया विठूराया उभा हात कटेवरी


चैतन्य वाहे गावा गावावरी

सडे रांगोळया रस्ते रस्त्यावरी

पालखीच्या आगमनानी सजली फुल वेलीवरी

फुलवेलींनी निसर्ग सडा रस्त्यावरी


वर्षाधारा बरसे आनंद गगनावरी

स्वागता ज्ञानीयांच्या आल्या पावसाच्या सरी

आल्या सरी वर सरी

वारकरी नाचे आपल्याच तालावरी


नाही तमा तया नाद विठूरायांवरी

पंढरी सोडून विठू संगे वारकरी

विठूराया नाचे घेऊनी हात कटेवरी

माऊली माऊली नाद आसमंतावरी


पाहू संताचे तेज तयांच्या मुखावरी

मोक्षानंद प्राप्ती तेज लहरी

चैतन्यवाहे संत मुखावरी

धन्य धन्य पाहू वारी


रिंगण सोहळा नाचे वारकरी

माऊली बसे अश्वावरी

माऊली माऊली गर्जना जाई नभावरी

चैतन्याचा सोहळा पंढरपूरी


जन्मा येऊनी करावी पायी वारी

जावे भेटण्या विठूरायांच्या पंढरपूरी

आत्मानंद घ्यावा व्हावे एकदा वारकरी

परमोच्च आनंद प्राप्ती विठूरायांच्या पंढरपूरी


आम्ही काव्यरसिक

पंढरीचे वारकरी




Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics