STORYMIRROR

Gangadhar joshi

Classics

4  

Gangadhar joshi

Classics

माघी एकादशी

माघी एकादशी

1 min
491

चांदणं फुटलंय शिवार हसलंय

लागलाय जुंधळा डोलायला 

चंदेरी कणीस मोत्यांची दाणं

लागल्यात वाकुल्या दाखवायला


वाऱ्याची झुळझुळ पानांची सळसळ

लागलाय आवाज घुमायला

थंडगार गारवा शिवार हिरवा

पिठूळ जमीन चमकायला


किड्याची किरकिर काजवा भिरभिर 

साद घालतोय चांदण्याला

बैलाची दावण कडवळची वैरण

घुंगरूचा आवाज गळ्यातला


कडब्याची खोपी कारभारी झोपी

घोंगड्याचं पांघरूण उशाला


तांबडं फुटलं दव चमकलं

लागला कोंबडा अारवायला

सोनेरी ताट वा सोनेरी कणसे

धरणी लागलीय हसायला


देवाचं देणं फिटलं पारणं

मल्हारी लागलाय नाचायला

वारकरी पंथ माळकरी संत

जाऊया म्हणतोय पंढरीला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics