संविधान दिन
संविधान दिन
स्वतंत्र भारताला मिळाला
संविधानरुपी मोलाचा ठेवा
लोकशाहीचा राज्यकारभार
मार्गदर्शक तत्वानुरुप व्हावा
अहोरात्र कष्टले बाबासाहेब
बनले घटनेचे खरे शिल्पकार
सहकार्यांच्या मदतीने झाले
संविधान हे सत्यात साकार
समता बंधूता न्याय समानता
लोकहिताचा सर्वस्वी विचार
समानता नि स्वातंत्र्य मिळता
अभिव्यक्तीलाही मुक्त संचार
परदेशी राज्यघटना अभ्यासून
देशहिताची तत्वे अंगिकारली
२६नोव्हेंबर १९४९ रोजी ही
संविधानरुपी घटना स्विकारली
२६जानेवारी १९५० दिवशी
संविधानाचा अंमल हा झाला
देशाकारभारा मिळाली दिशा
लोकशाही शब्दा अर्थ आला
संविधानाचे जाणूनी महत्त्व
संविधानाचा राखूया सन्मान
लोकहितवादी लोकशाहीला
संविधानाचा असे अभिमान