अभंग "आई"
अभंग "आई"
देवा कशी वेळ आली।।आई माझी हरवली।।
दरबारी तुझ्या आली।। हेवा का माझा देवा।।
बाळ मी असे सानुले ।। प्रेम आईचे हेरले।।
भाग्य तू माझे लिहले।। मानावे देव तुला।।
बघ भोग व्यथा माझी।। चिरेबंदी घेरा माझी।।
करपून गेली सांझी।। प्रेम तुला ना दिसे ।।
भटके मन रे आता।। आई हाक घाव आता।।
कशी मांडू व्यथा आता।। घे धाव देवा माझ्या।।
आई जगी त्याचे भाग्य।।कळे चूक त्याला योग्य।।
आईविना कसे भाग्य।। पडला प्रश्न देवा।।
घेतो तू जन्म या जगी ।। आईविना ना तू योगी।।
जाणतो महत्त्व जगी।। मग आईविना मी।।
महिमा सांगे तू खरा।। म्हणवितो परमेश्वरा।।
कधी आटतो तो झरा।। असे वागता देवा।।
आईची सेवा तू केली।। ना संधी मला तू दिली।।
काय चुक मी रे केली।। मागतो देवा आई।।
आईविना न जगणे।।आईविना न हसणे।।
आईविना हे असणे।। मला दे खरा अर्थ।।