STORYMIRROR

Umakant Kale

Others

3  

Umakant Kale

Others

दारुड्या पतीची आरती

दारुड्या पतीची आरती

1 min
119

सदाकदा शपथ माही खाता

दिवस मावळता पिऊन येता..

घरात आम्हाले मोताज करता

लेकराचं हाल उगाच करता..

जय देवा जय देवा पती देवा

कुणी पाजो किंवा नाही पाजो

म्हणे आपणचं मारा पवा....।। धृ।।


कामा धंद्याला तुम्ही कुठे जाता ?

गेला तरी कुठे तुम्ही ठिकता..!

उधारीवर हो तुम्ही हो जगता

पैसे द्यायला मग टाके पिकतात..

जय देवा जय देवा पती देवा

कुणी पाजो किंवा नाही पाजो

म्हणे आपणचं मारा पवा....!!१!!


हौस मौस कधी कुठे करता

डुलत लोळत घरी पोहचतात

कपड्यांना चप्पलांना कुठे दान करता

तोंडात शिव्याशापाची भाषा ठेवतात..

जय देवा जय देवा पती देवा

कुणी पाजो किंवा नाही पाजो

म्हणे आपणचं मारा पवा....!!२!!


अन्नाच्या जागी शेण खातात

दोन पैशाची पिऊन धिंगाणा करतात..

बाहेरून मार खाऊन रोज येतात

घरात लेकरानवर जोर टाकतात...

जय देवा जय देवा पती देवा

कुणी पाजो किंवा नाही पाजो

म्हणे आपणचं मारा पवा....!!३!!


नाही उरले बहीणीचं भाऊ

रक्षणाचे धागे विकून खाऊ

सरकार म्हणते इकडे नका पाऊ

अशाने होईल आमच्या तिजोऱ्यात बाऊ..

जय देवा जय देवा दारु देवा

तुम्ही तर म्हणाल थोडी नाही

आता पुरा खंभा पिवा....!!४!!


Rate this content
Log in