STORYMIRROR

Umakant Kale

Tragedy

4  

Umakant Kale

Tragedy

पुन्हा लिहिले पत्र

पुन्हा लिहिले पत्र

1 min
647


लिहिले मी पत्र तुजला

दे हाक तू मजला..।।धृ।।


शोधूनि शब्द आणिले,

प्रेमही गुंफले

ना आले जे हृदयात 

पत्रात मी ते मांडले

लिहिले मी पत्र तुजला

दे हाक तू मजला...।।१।।


स्पर्श ना तुजला

नाही भाव मनी जागले

फिरवुनी तू पाठ अशी

तरीही मन माझे तुला वाहिले

लिहिले मी पत्र तुजला

दे हाक तू मजला.. .।।२।।


लागला डाग मजला

एकतरफी प्रेमाचा

पत्र वाचुनी ये आता

हवा पाझर प्रेमाचा

लिहिले मी पत्र तुजला

दे हाक तू मजला.. .।।३।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy