STORYMIRROR

Pranali Salve

Tragedy Others

3  

Pranali Salve

Tragedy Others

त्यात तिची काय चूक?

त्यात तिची काय चूक?

1 min
270

त्या काही क्षणाच्या सुखात

होय नाही करत

जन्मली ती... मुलगी 

आनंद ही होताच पण बोझ वाढलं

त्यात तिची काय चूक


बागडणाऱ्या वयात 

हे नको करू ते नको करू

इकडेच ये अन् शांत बस 

असं सांगणाऱ्या आई ला धाक तर होताच 

पण त्यात तिची काय चूक


वाढणाऱ्या वयात 

त्याच्या घाणेरड्या नजरा 

आणि तो किळसवाणा स्पर्श 

सहनच करत राहिली बिचारी

नको नको म्हणत वावरत राहिली 

त्यात तिची काय चूक


त्यातच स्वप्न बघितले 

पूर्ण करायची जिद्द सुध्दा

पण आधार अन् मार्गदर्शन 

करण्या अगोदरच 

ती स्वप्न चिरडून गेली 

त्यात तिची काय चूक


एवढ्यातच भर रस्त्यात

पेटवली तिला

अगदी 8 महिन्याची असताना जीव सोडावा लागला

पण अत्याचार जणू रमत राहिला

त्यात तिची काय चूक


झालं गेलं विसरून

पडली त्याच्या प्रेमात 

वाटलं प्रेमच मिळेन

अन् त्यानं लादलं ओझं फक्त अपेक्षांचं

पदरी आल्या त्या अपेक्षाच फक्त

त्यात तिची काय चूक


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy