Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pranali Salve

Others

5.0  

Pranali Salve

Others

ती

ती

1 min
132


ती म्हणजे

पावसाची सरी तर

कडक्याची वीज सुद्धा..


ती म्हणजे

मंद वाहणारा वारा तर

वादळी गोंगाट सुद्धा..


ती म्हणजे

मायेची ऊब तर

हुडहुडी भरवणारा गारठा सुद्धा..


ती म्हणजे

पहाटेचं दवबिंदू तर

खळखळता झरा सुद्धा..


ती म्हणजे

उमललेली कळी तर

खुपलेले काटे सुद्धा..


ती म्हणजे

शांत सागर तर

उसळलेल्या लाटा सुद्धा.. 


ती म्हणजे

लुकलुकणारी चांदणी तर

तेजस्वी धूमकेतू सुद्धा..


ती म्हणजे

गोड हसणं तर

कोमेजणारं फूल सुद्धा..


ती म्हणजे

मधुर संगीत तर

खरवडलेला सुर सुद्धा..


ती म्हणजे

लख्ख प्रकाश तर

गर्द काळोख सुद्धा..


तर ती म्हणजे

पावसाची निरागस सरी सुद्धा

निरागस सरी सुद्धा..  


Rate this content
Log in