STORYMIRROR

Pranali Salve

Romance Others

4  

Pranali Salve

Romance Others

माहीत होतं...

माहीत होतं...

1 min
437

मला तर फक्त लिहिण माहित होत 

शब्द तर तुझ्या कडून शिकत गेले.. 

काळजी करण माहित होत 

प्रेम तर तुझ्या कडून शिकत गेले.. 

चालायचं माहित होत इतरांना सोबत घेऊन

चालन तुझ्या कडून शिकत गेले.. 

बोलन माहित होत बोलण्यात गोडवा टाकण

तुझ्या कडून शिकत गेले.. 

आनंदी राहाण माहित होत 

दुसर्यांना आनंदी ठेवण तुझ्या कडून शिकत गेले... 

हसण आणि हसवण माहित होत 

इतरांसाठी हसन तुझ्या कडून शिकत गेले.. 

चिडण, रागवण माहित होत 

त्या मागचं कारण शोधन तुझ्या कडून शिकत गेले.. 

हसणारयाला चिड आणन माहित होत.. 

पण चिडलेल्याला हसवण तुझ्या कडून शिकत गेले... 

रडवण माहित होत पण रडणारयाचे डोळे पुसण

तुझ्या कडून शिकत गेले... 

नाती जोडण माहित होत पण

निभवण तुझ्या कडून शिकत गेले... 

मोठ होण माहित होत पण

समंजस पणा तुझ्या कडून शिकत गेले... 

मला तर फक्त लिहिण माहित होत,

शब्द माञ तुझ्या कडून शिकत गेले..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance