तुझी कविता
तुझी कविता
तुझ्यावर केलेली, तुझ्यासाठी लिहिलेली, तुझी कविता,
तुझ्या वर्णनाने, तुझ्या स्पर्शाने, सजलेली कविता.
हे बडबडणारे, खेळणारे, मृदू-खट्याळ तुझे शब्द,
कागदही गुलाबी होतो तुझे शब्द लिहिता लिहिता.
वर्णन असते नेहमी तुझ्या केसांचे, तुझ्या डोळ्यांचे,
अन् गहिवरते कविता तुझे ओठ होता होता.
तुला उडताना मी पाहिलयं, वाचलयं माझ्या कवितेमध्ये,
वाढते कवितेची उंची तू कागदात येता येता.
मग कवितेत तू पावसात भिजतेस, असतेस ओल्या
रूपात,
शब्द ही थोडे ओलसर होतात तुझे अंग घेता घेता.
ही कविता तुझ्यासारखीच सुंदर-शांत दिसू लागते,
तुझे स्वभाव प्रत्येक ओळीत दिसतात येता-जाता.
हळूच कवितेला तुझ्या मृदू गालांची आठवण होते,
खळी पडते कागदाला तू दूरूनी हसता हसता.
या शब्दांनाही मग तुला लिहिण्याची सवय लागते,
कधी लिहितो कविता मी शब्दांवर जळता जळता.
तू अशीच नेहमी माझ्या कवितेत येत रहा,
तुझ्या कवितेमुळेच येतेय किंमत जगता जगता.